Tuesday 19 January 2016

चिंचेची झाडे: चिंच म्हंटल की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटतं. व लगेचच आंबट गोड चव आल्यासारखी वाटते. प्रत्येक खेड्यापाड्यात सदाहरित सदापल्लवित म्हणून पाहावयास मिळतात. या झाडाची कोवळी पाने व पाकळ्या खेड्यामध्ये चवीने खातात. त्याची चव आंबट तुरट अशी असते. या वृक्षाची उंची ७० ते ८० फुट इतकी असते. काही झाडे शंभर फुट पर्यंत ही वाढतात.याचा आकार चौफेर असून, घाटदार असतो.




ताडीच्या झाडाला रात्री मडके अडकवून त्याला कोयत्याने खापे मारतात. त्यातून थेम्बाथेम्बाने गोड रस पाझरतो. त्या गोड रसास नीरा म्हनतात. ती मडक्यातून काढून हल्ली मार्केतिंगची व्यवस्था झाल्याने व प्रचार झाल्याने विकतात. ती मधुर असते. मात्र हा गोड रस जसजसे उन वाढत जाते तसे उष्नतेने आम्बू लागतो व दुधाळ रंगाची ताडी तयार होते